22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडावी

ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडावी

जालना : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडावी, असे आता मनोज जरांगेंनी म्हटले आहे. विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. काही दिवसांतच ते शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पार करणार आहेत. मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मूळ गावी जाणार आहेत, त्याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर भूमिका काय? असे देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे मी ऐकले. जर फडणवीस इतकं क्लिअर सांगत असतील तर या तीन नेत्यांनी स्पष्टपणे सांगावं की त्यांची भूमिका नेमकी काय आहे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे हे तिघांनीही सांगावे. जर हे तिघेही म्हणत

नसतील तरीही सरकारने बिनधास्त ओबीसींना आरक्षण द्यावे. सरकारने जर मराठा आरक्षण दिले तर मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील. काहीही गरज नाही, तुम्ही विचारले त्यांनी सांगितले नाही तर तुम्ही आरक्षण द्या, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR