ठाणे : प्रतिनिधी
शहरातील बारा बंगला परिसरात पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकीय निवासस्थान आहे. बंगल्याच्या आवारात ४० ते ५० कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या. त्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. घटनेची दखल घेत जिल्हा पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हा फैलाव इतरत्र कुठेही झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी नमूद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील बारा बंगला परिसरात पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकीय निवासस्थान आहे. बंगल्याच्या आवारात ४० ते ५० कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून त्यातील काही कोंबड्यांचा अचानक जीव जात असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.
अखेर पशुसंवर्धन विभागाने त्या दगावलेल्या कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले. अखेर मंगळवारी रात्री या चाचणीचा अहवाल असता, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले.