लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर यांना रोटरी क्लब ऑफ लातूर, श्रेयसच्या वतीने दिला जाणा-या व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. राम बोरगावकर यांनी आजतगायत दिलेल्या शैक्षणिक, संगीत, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल रोटरी परिवार, श्रेयस, लातूरच्या वतीने रोटरी चे गव्हर्नर डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांच्या हस्ते ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार – २०२५’ पुरस्काराने डॉ.रह्याम बोरगावकर यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर रोटरी क्लब,लातूर श्रेयस चे गव्हर्नर डॉ. हरिप्रसाद सोमाणी,रोटरी क्लब,लातूर श्रेयस च्या अध्यक्षा सौ.संजीवनी कडतने, सचिव सौ.शालिनी पाटील,डॉ. मायाताई कुलकर्णी,प्रकल्प अधिकारी रो.सुमन सोमाणी,सह.अधिकारी रो.अंबादास सोमवंशी, सुनीता बोरगावकर, प्रा. वैशाली बोरगावकर हे उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तुकाराम पाटील, प्रा. शिवराज मोटेगावकर, प्राचार्य बाबुराव जाधव, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्राचार्य डॉ. सुदाम पवार, प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. विश्वनाथ स्वामी आणि सरस्वती संगीत कला महाविद्यालयातील येथील सर्व स्टाफ व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.