मुंबई : प्रतिनिधी
कल्याणशेजारच्या डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आला आहे. सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू समारंभावरून हा वाद झाला. पूजा आणि हळदी-कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला. पूजा आणि हळदी-कुंकू समारंभासंदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे. मुंबईच्या परिसरात मराठी-अमराठी आपापसात भिडले असून हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात भाषिक वादासह मराठी विरुद्ध अमराठी अशा वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. कालच कल्याणमध्ये एका मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. या तरुणाने व्हीडीओ रेकॉर्ड करून मनातील संताप बोलून दाखवला होता. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मानपाडा पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका मराठी तरुणाने रेल्वे स्टेशन परिसराची दुरवस्था मांडली होती. यावेळी परप्रांतीय रिक्षाचालकांनी त्याच्यावर हात उचलला होता.