मुंबई : प्रतिनिधी
१९ जानेवारीला रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असला तरी प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) ला याच पालकमंत्र्यांना ध्वजारोहणाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा नुकतीच झाली. त्यामध्ये रायगडसाठी आदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नावे समोर आली आहेत. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक नेते, पदाधिकारी आक्रमक झाले होते. पालकमंत्री बदलण्यासाठी जोर लावला जात होता. अखेर यावर निर्णय घेण्यात आला असून, जाहीर केलेल्या या दोन नावांना स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान,
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर विविध जिल्ह्यांतील पालकमंत्री कोण असेल याच्या नावांची घोषणाही झाली. त्यामध्ये तटकरे आणि महाजन यांच्या नावांना स्थानिक शिवसेनेच्या पदाधिका-यांकडून विरोध केला जात आहे. महाराष्ट्रात पालकमंत्रिपदाचा वाद शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान, १९ जानेवारीला रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. असे असले तरी प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.