23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरतन नाशकाचा अतिवापर पिकासाठी अपायकारक

तन नाशकाचा अतिवापर पिकासाठी अपायकारक

जळकोट : प्रतिनिधी
शेती कामासाठी मजुरांची समस्या निर्माण होत असल्याने शेतकरी तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा भरमसाठ वापर करतात. यामुळे तणांचा बंदोबस्त होत असला, तरी सततच्या अतिफवारण्यांमुळे जमिनीत पिकांना पोषक असणा-या सूक्ष्म जिवाणूंचा नाश होत आहे. त्यामुळे शेतक-यांनी शक्यतो तण नियंत्रणासाठी खुरपणी, कोळपणी करणेच योग्य आहे.

ग्रामीण भागात सध्या शेती कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे पिकात तण वाढते आणि पिकांवर रोग पडतो. झटपट तणांचा नायनाट करण्यासाठी अनेक शेतकरी दरवर्षी तणनाशकाची फवारणी करतात. वारंवार तणनाशकाचा वापर केल्याने उत्पादन खर्च वाढून जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचा नाश होते. याचा कालांतराने उत्पादनावर परिणाम होतो. तण नियंत्रणासाठी खुरपणी, कोळपणी करणेच योग्य आहे.

औषधापेक्षा यंत्राचा वापर अधिक चांगला : उगवणपूर्व व उगवणीनंतरच्या तणनाशकांची जादा मात्रा झाल्यास कोवळ्या पिकांना इजा होऊन पिके वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे योग्य प्रमाणातच पिकांसाठी तणनाशकांचा वापर करावा. तसेच यंत्राचा अधिक वापर करून तणांचा बंदोबस्त करावा, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR