29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeअंतरराष्ट्रीयतहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबई हल्ल्यातील (२६/११) आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. त्यामुळे राजनैतिक माध्यमातून राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, ते जिल्हा न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

मुंबई हल्ल्याच्या ४०५ पानांच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचा उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. आरोपपत्रानुसार राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला. ३०० जण जखमी झाले होते. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. या चकमकीत पोलिसांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले आणि अजमल कसाबला अटक केली. त्याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR