चाकूर : प्रतिनिधी
शिक्षण विभाग पंचायत समिती चाकूर व भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते. या प्रदर्शनात सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींचा प्रयोग द्वितीय आला. झरी बु केंद्रात या प्रयोगाला प्रथम स्थान मिळाले होते सर्व विद्यार्थींनीचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या प्रदर्शनात सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनीं जान्हवी चाटे आणि सृष्टी सुरवसे या दोघींनी सांड पाण्याचे व्यवस्थापन या प्रयोगाबद्दल माहिती दिली. या प्रयोगाला द्वितीय स्थान मिळाले याच प्रयोगाला केंद्रातही द्वितीय स्थान मिळाले होते. सिद्धेश्वर विद्यालयाने केंद्रात दोन प्रयोग दाखवले होते. सांडपाण्याचे व्यवस्थापन या प्रयोगाला प्रथम आणि चंद्रयान थ्री द्वितीय क्रमांक मिळाला होता. विद्यार्थिनींनी केंद्रात चंद्रयान ३ हा यशस्वी प्रयोग करून दाखवला. या प्रयोगात सय्यद सिमरन व मुस्कान शेख हिने प्रयोगाची माहिती यशस्वीरित्या सांगितली. झरी केंद्रात चंद्रयान थ्री हा प्रयोग यशस्वीरत्यिा दाखवण्यिात आला.
झरी केंद्रामध्ये अनुष्का पाटील व मारिया खायमी या दोघींनी आरोग्य आणि कल्याण या प्रयोगाबद्दल माहिती सांगितली. या प्रयोगाला विज्ञान विभाग प्रमुख प्राचार्य गिरधरराव कणसे पाटील व सुरज पाटील यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांचा प्राचार्य व गट साधन केंद्राचे रिसोर्स टीचर जयशकुमार करडीले, प्रा.शिक्षक कर्मचा-यांंच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य गिरीधरराव कणसे पाटील, प्रा.वैजनाथ सुरनर, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, प्रा.दयानंद झांबरे, व्यंकटराव सिंदगे, बालाजी सोमवंशी, जावेद शेख, विनय नकाते, सुरज पाटील, हनुमंत तावरे, भालचंद्र डांगे मुराद शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.