24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरतीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन

तीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन

लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात प्रथमच लातूर येथे दि. १० ते १२ जानेवारीदरम्यान तीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महासंमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय शैक्षणिक महासंमेलनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात सध्यस्थितीत होणा-या विविध बदलांची माहिती तसेच परिपूर्ण ज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगारांच्या नवीन संधीची व तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्या मार्गदर्शनाची नेमकी हीच गरज ओळखून मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह-२०२५ (मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन २०२५) चे   लातूर नगरीत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे.
 या शैक्षणिक महासंमेलनात  विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व आय. ए. एस. अधिकारी यांच्या प्रेरणादायी व भविष्यवेधी मुलाखती, शैक्षणिक क्षेत्रातील भेडसावणा-या प्रश्नांवर व नोकरीच्या संधी या विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची व्याख्याने, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संस्था यांच्यासाठी दिशादर्शक, नाविन्यपूर्ण विविध साहित्य कृतींचे, बदलत्या अत्याधुनिक अद्यावत तंत्रज्ञानाचे, शैक्षणिक साधनांचे १०० पेक्षाही अधिक स्टॉल्स यावेळी लावण्यात येणार आहेत. या महासंमेलनात सहभागी झालेल्या शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच महासंमेलनातील शैक्षणिक सत्रास नोंदणी करुन उपस्थित राहणा-या विद्यार्थी व शिक्षक यांना ऑनलाईन सहभागाचे  प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या महासंमेलनाचा मराठवाड्यातील शिक्षणप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहनही महासंमेलनाचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे, उपाध्यक्ष विजय सहदेव, सचिव प्रमोद भोयरेकर, कोषाध्यक्ष अमोल चव्हाण, संचालक विवेक सौताडेकर  यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR