19.7 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रतुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला

तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला

धुळे : प्रतिनिधी
गेल्या १० वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न शरद पवारांना विचारतात. शरद पवारांनी एवढंच केलं, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केला.

दरम्यान, शरद पवार हे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. शरद पवारांची आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथे जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतले. लोकशाही वाचवण्यासाठी थोडी काळजी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय होते हे कळत नव्हते. त्यांनी लोकसभेला ४०० पारचा नारा दिला. लोक हुशार होते. ४०० लोकांना समजले. लोकांना कळले की देशाची घटना बदलायची आहे म्हणून त्यांना ४०० पार हवे होते. त्यांनी हा डाव हाणून पाडला’’, असे शरद पवार म्हणाले.

‘‘महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी १० वर्षांचा हिशेब दिला पाहिजे. त्यांची १० वर्षांपासून सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केलं? आज महाराष्ट्रामध्ये ७०० पेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली. केंद्रात आमचं सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले’’, असे शरद पवार म्हणाले.

महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या
आज शेतकरी चिंतेत आहे. आम्ही देशातील शेतक-यांचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफीचा प्रस्ताव आणला. आम्ही ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र मोदी ते करत नाहीत. एकीकडे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांत ९०० महिलांवर अत्याचार झाले, आणि सरकार म्हणते आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या, असे शरद पवारांनी सुनावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR