वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
ग्रेटर अमेरिका बनवणार हे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीररित्या घोषित केले आहे. कॅनडा, पनामा कालवा आणि ग्रीनलँड हे त्यांच्या ग्रेटर अमेरिका प्लानचा भाग आहे. ग्रीनलँड डेन्मार्ककडून परत घ्यायचा ट्रम्पचा इरादा आहे. या मिशनवर त्यांनी आपला मुलगा ट्रम्प ज्यूनियरला ग्रीनलँडला पाठवले.
ग्रीनलँडमध्ये २.१६ मिलियन वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले जगातील सर्वात मोठे बेट आहे. डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असलेला हा स्वायत्त देश आहे. अमेरिकेसाठी रणनितीक आणि सुरक्षेच्या दृष्टीने ते खूप खास आहे.
ग्रीनलँडमध्ये दुर्मिळ खनिजांचे साठे आहेत. तेल आणि गॅसही भरपूर प्रमाणात आहे. एका अंदाजानुसार ५० बिलियन बॅरल तेल आहे. बर्फ वितळल्यास भविष्यात एक नवीन समुद्री मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या जियोलॉजिकल सर्वेनुसार अमेरिकेच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेल्या ५० पैकी ३७ खनिजे ग्रीनलँडमध्ये मध्यम आणि उच्च प्रमाणात आहेत.
ग्रीनलँडची लोकसंख्या फक्त ५६ हजार आहे. इथला जीडीपी ३.३ बिलियन डॉलर आहे. ग्रीनलँड ताब्यात आल्यास समुद्री व्यापारावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण होईल. आर्क्टिकमध्ये नवीन व्यापारी मार्गावर वर्चस्व मिळेल.
ग्रीनलँडचा चौथा हिस्सा बर्फाने झाकलेला आहे. यात जगातील ७ टक्के गोड्या पाण्याचे भांडार आहे. ट्रम्प ग्रीनलँड परत मिळवण्यात यशस्वी ठरले, तर अमेरिकेसाठी रणनितीक दृष्टीने तो मोठा विजय असेल. अमेरिका अधिक मजबूत होईल. भविष्यात अनेक धोक्यांपासून अमेरिकेचा बचाव होऊ शकतो.