22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरथकित मालमत्ता करावरील व्याज माफ

थकित मालमत्ता करावरील व्याज माफ

लातूर : प्रतिनिधी
थकीत मालमत्ता कर भरणा-या मालमत्ताधारकांना मनपाकडून अनोखी सवलत देण्यात येत असून दि. ३१ मार्चपूर्वी आपल्या कराचा एकरकमी भरणा करणा-या मालमत्ताधारकांचे कराच्या रकमेवर आकारण्यात आलेले संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे कर थकलेला आहे.अनेकवेळा सूचना करून व नोटीसा देऊनही या कराचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनपाने थकीत करावर २ टक्के व्याज आकारलेले आहे.तरी देखील मालमत्ता कराचा भरणा होत नसल्याने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी कराधान नियम ५१ अन्वये व्याजामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत व चालू कराचा एकरकमी भरणा दि.३१  मार्च २०२४ पूर्वी केला तर अशा मालमत्ताधारकांना व्याजातून १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेत शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत  व चालू मालमत्ता कराचा एकत्रित भरणा पालिकेकडे करावा, असे आवाहन मनपा आयुक्त्तांनी केले आहे.सवलत देऊनही जे नागरिक कर भरणा करणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील केल्या जातील.संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपल्याकडील करांचा भरणा मनपाकडे करुन मनपास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त्तांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR