22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रथोपटे, कोल्हेंचा थकहमी प्रस्ताव रद्द

थोपटे, कोल्हेंचा थकहमी प्रस्ताव रद्द

अभिजित पाटील, नाईक यांच्या कारखान्यांना मदत
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील एकूण १३ सहकारी साखर कारखान्याचे थकहमी अर्थात मार्जिन लोनचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसी मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र, लोकसभेत यांची मदत झाली नाही, म्हणून २ सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावात कागदोपत्री त्रुटी काढत सदरील साखर कारखान्याचे प्रस्ताव रद्द केले. यामध्ये भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. मात्र, अभिजित पाटील आणि आ. मानसिंग नाईक यांच्या कारखान्यांना थकहमी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी बारामती लोकसभेत अजित पवार यांना शब्द देऊनसुद्धा अपेक्षित मदत केली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा ८० कोटींचा मार्जिन लोन थकहमीचा प्रस्ताव रद्द केला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचे भाजपाचे तरुण नेते विवेक कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा १२५ कोटींचा मार्जिन लोन थकहमी प्रस्ताव रद्द केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिलेले अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ३४७ कोटी रुपयाची थकहमी देण्यात आली. तसेच सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि जयंत पाटील समर्थक आमदार मानसिंग नाईक यांच्या कारखान्याला ६५ कोटी रुपयांची थकहमी देण्यात आलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR