24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्यादगडफेकीत अनिल देशमुख जखमी

दगडफेकीत अनिल देशमुख जखमी

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विधानसभा निवडणुकीला गालबोट लागण्याची घटना घडली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले आहेत.

अनिल देशमुख यांचे चिरंजीव हे काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या दगडफेकीत देशमुख जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, भाजपकडून अनिल देशमुख यांचा हा स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळावी यासाठी स्वत:वर हल्ला घडवून आणला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR