19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरदलदल, डासांमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात 

दलदल, डासांमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात 

लातूर : सिद्धेश्वर दाताळ
मागील आठ दिवसांपासूनपासून सुरु असलेल्या पावसामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातील खडयांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे हे जिल्ह्यांचे बसस्थानक आहे की डबक्यांचे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. सर्वत्र चिखलाने प्रवाशांची गैरसोय तर होतच आहे. परंतु, दलदल आणि डासांमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खड्डे बुजविण्याची कसरतही एस. टी. महामंडळातर्फे घेतली जात नसल्याचे प्रवाशांची ओरड चालू आहे.
शहरातील मुख्य असलेले मध्यवर्ती बसस्थानकात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शेकडो बसेस ये-जा करित असतात. त्याद्वारे दिवसभरात हजारो प्रवाशी या ठिकाणाहून प्रवास करतात. या स्थानकात उतरतात. दिवसभर प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बसस्थानकात सुविधांची वानवा आहे. स्थानकाच्या आवारात प्रवाशांसाठी कुटल्याही सुविधा नाहीत. याचा प्रत्यय प्रवाशांना येऊ लागला आहे. बसस्थानकाच्या आवारातील गतवर्षापुवी टाकलेला मुरूम उखडल्याने, जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
मध्यंतरी या स्थानकाच्या आवारात पडलेल्या खडयांमध्ये जुन्या बांधकामाचे साहित्य टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो केवळ दिखावूपणा होता असे प्रवाशांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील खड्डयांमध्ये जागोजागी पाणी भरले आहे. त्यामुळे हे जिल्ह्याचे बसस्थानक आहे की, डबक्यांचे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे. स्थानकात येणा-या बसेस अतिशय भरधाव वेगाने येत असतात. खडयांमधील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडतअसल्याचे भान चालकांना नसते. त्यामुळे प्रवाशांचेच कपडे खराब होत असतात. स्थानकात जागोजागी खड्डे पडल्याने, प्रवाशांना चालता येत नाही, अशी स्थिती आहे. मात्र वरिष्ठ अधिका-यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
बसस्थानकाचा आवार खड्डेमुक्त करावा. याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे. पेव्हर ब्लॉक बसवावेत स्थानकात प्रवेश करण्याची सुरूवातच खड्डयाने होत असतो. बाहेरगावाहून येणा-या बसगाड्या ज्या दिशेने येतात, तेथे मोठे-मोठे खडे पडले आहेत. यावर पर्याय म्हणून स्थानकाच्या संपूर्ण आवारात पेव्हर ब्लॉक बसवावेत. म्हणजे बसस्थानक खड्डेमुक्त्त होण्यास मदत मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR