26.1 C
Latur
Monday, September 30, 2024
Homeलातूरदसरा महोत्सवनिामित्त बाभळगाव येथे भव्य रामलीला

दसरा महोत्सवनिामित्त बाभळगाव येथे भव्य रामलीला

लातूर : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या रामायणाचे अद्वितीय सौंदर्य अनुभवण्याची संधी सर्व लातूरकरांना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी श्री भुवनेश्वर वशीष्ठजी महाराज यांच्या मंत्रमुग्ध करणा-या वाणीत रामलीला सादर केली जाणार आहे. या रामलीला कार्यक्रमाचे आयोजन बाभळगाव येथे दसरा महोत्सवानिमित्त करण्यात आले आहे.
रामलीलाचे आयोजन नवरात्र महोत्सव समिती, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, तंटामुक्त ग्राम समिती व ग्रामस्थ बाभळगाव यांच्या वतीने हे भव्य आयोजन ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान श्री व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, मैदान, बाभळगाव येथे करण्यात आले आहे. या रामलीला कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय महाकाव्यांतील रामायण हे प्रसिद्ध ऋषी वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. हा प्रसिद्ध धर्मग्रंथ संस्कृतमध्ये काव्यात्मक स्वरुपात रचला गेला. रामायण ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची कथा आहे, जिथे भगवान रामाने आपली पत्नी सीतेला वाचवण्यासाठी राक्षस राजा रावणाचा वध केला. हे महाकाव्य भारतीय संस्कृतीतील आदर्श आहे. यावर श्री भुवनेश्वर वशीष्ठजी महाराज रामलीला सादर करणार येणार आहेत, यामध्ये ३० पेक्षा अधिक कलावंत आहेत.
स्वामी भुवनेश्वर वशीष्ठजी यांची रामलीला केवळ एक कथा नाही, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी एक आध्यात्मिक यात्रा आहे. त्यांच्या रामलीलेतून रामायणातील प्रत्येक पात्र आपल्यासमोर जिवंत होईल. रामायणावरील ही रामलीला केवळ एक कथा नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणारा एक मार्गदर्शक आहे, असे स्वामीजी म्हणाले. श्री रामलीला कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष, नवरात्र महोत्सव समिती, ग्रामपंचायत सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरंपचं गोविंद देशमुख, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव गंगाराम जटाळ, व्हाईस चेअरमन शिवाजी आप्पाराव जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवराज नागोराव देशमुख व ग्रामस्थ बाभळगाव यांच्याकडून तयारी करण्यात येत आहे. श्री व्यंकटराव देशमुख महाविदयालय, मैदान बाभळगाव येथे ३ ते १२ ऑक्टोंबरदरम्यान दररोज सांयकाळी ७ वाजता ते रात्री १० वाजता पर्यंत ही रामलीला होणार आहे. या रामलीला कार्यक्रमाची सुरुवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाने होणार आहे.  सर्व दैनदीन कार्यक्रम वेळेवर सुरु होणार आहेत.
पावसाची शक्यता पाहता भावीकांनी सोबत छत्री आणावी. नवरात्र महोत्सवनिमित्त आयोजीत केलेल्या या रामलीला कार्यक्रमाचा सर्व भावीकभक्त्तांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR