26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरदारूड्या पोलीस कर्मचा-यावर गुन्हा

दारूड्या पोलीस कर्मचा-यावर गुन्हा

लातूर : प्रतिनिधी
उदगीर शहर पोलीस ठाण्यात नूमणूकीस असलेल्या नागरगोजे नामक दारूड्या पोलीस कर्मचा-यांने मागील तीन दिवसांपासून उदगीरकरांना वेठीस धरले चांगलेच वेठीस धरले होत. त्याने दारूच्या नसेत एका कारवर दगड मारून काच फोडली. तर अनेक नागरिकांसोबत अरेरावी केल्याची घटना घडली असून शहर पोलीसांनी जीप मध्ये कोंबून ठाण्यात नेले. तसेच ठाण्यात ही त्याने दारूच्या नशेत हुज्जत घातल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून कारच्या काचा फोडल्या प्रकरणी त्या दारूड्या पोलीस कर्मचा-या विरोधात उदगीर शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 उदगीर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या माधव नागरगोजे नामक पोलीस कर्मचा-याने मागील तीन दिवसापासून दारूच्या नशेत उदगीरकरांना वेठीस धरले होते. दारूच्या नशेत दुचाकी इतर वाीने आडवणे, नागरिकांशी अरेरावीची भाषा करने, त्यांच्याशी हुज्जत घालने एवढेच नाही तर वाहनावर दगडफे क करणे असे आदी प्रताप केले आहे. शहर पोलीसांनी घटनास्थळावरून पोलीसांच्या जीप मध्ये कोंबून ठाण्यात नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
दि. १४ रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सह्यादी लॉज समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ एमएच २४ एएस ४३६३ क्रमांकाच्या काचेवर अंदाजे ५७ किलो वजनाचा दगड मारून कारचे ४० हजार रूपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उस्मान छोटूमियाँ चौधरी यांच्या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी माधव नागरगोजे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचे व्हिीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR