23.6 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रदारूवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसेवाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात

दारूवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसेवाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात

ओबीसी नेत्याचे गंभीर आरोप

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे. दारूवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसेवाले आहेत. ज्यांना रिझर्व्हेशनचं स्पेलिंग माहीत नाही, असे डझनभर मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना आम्ही पाडणार आहोत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी यासाठी उपोषणही केले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बांधवांना ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक मतदान करतील. ओबीसी असंघटित आहेत. याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही, असे कोणी समजू नये. नालायक लोक विधानसभेत असलीत तर आम्ही विधानसभेत लायक माणसे पाठवू. संविधानिक तत्त्वावर बोलणारी माणसं पाठवू, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

उद्या मुंबईला जाणार आहोत. आम्ही काही लोकांची यादी बनवली आहे. त्या मतदारसंघात काम करणार आहोत. काही आयटी कंपन्यांसोबत बोललो आहे. १०० मतदारसंघांतील लोकांची मतं जाणून घेतली. आम्ही प्रॅक्टिस करतो, फक्त बोलत नाही. जातीनिहाय १०० लोकांची यादी आहे. त्यात सर्वपक्षीय लोक, ज्यांनी जरांगेला रसद पुरविली, पाठिंबा दिला, त्यांना ओबीसी समाज पाडणार आहे, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR