मुंबई : विशेष प्रतिनिधी
बीड जिल्हा गेल्या महिनाभरापासून गु्न्हेगारी आणि गुंडगिरी व दहशतीच्या वृत्तांनी समोर आला. त्यातच, परळी मतदारसंघात खंडणी, गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्ह्याच नाव राज्यात झाकोळल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर परळीचा झेंडा दावोसमध्ये टॉरल इंडिया या जागतिक कंपनीचे एम.डी. भरत गिते यांच्या निमित्ताने फडकलेला दिसला.
टॉरल इंडिया ही पुण्यातील जागतिक दर्जाची अत्याधुनिक अल्युमिनियम फाउंड्री आहे, जी विविध उद्योगांना अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याचे काम करते. नुकतेच या कंपनीने दावोसमध्ये राज्य सरकारसोबत ५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यातून १२०० जणांना रोजगार मिळू शकेल. टॉरल इंडिया लिमिटेड ही स्टील आणि धातू क्षेत्रात काम करणारी जर्मन कंपनी आहे.
अहिल्या नगरमधील सुपा येथे उत्पादन कार्याचा विस्तार करण्यासाठी टॉरल इंडियाने महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. जागतिक स्तरावरील इंटिग्रेटेड अॅल्युमिनियम फाउंड्री असलेल्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सुपा (अहिल्या नगर) येथील १२,००,००० चौरस फूट परिसरात उत्पादन सुविधेचा विस्तार करणार आहे.
पुण्यातील ३,००,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सध्याच्या प्रकल्पासह, ही कंपनी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्ससाठी विश्वासू भागीदार बनली आहे. यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी (संरक्षण), भारतीय रेल्वे, एबीबी, जनरल इलेक्ट्रिक, सिमेन्स आणि ोसंग यांसारख्या प्रतिष्ठित क्लायंटचा समावेश आहे.