29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमनोरंजनदिव्या खोसला घेणार घटस्फोट?

दिव्या खोसला घेणार घटस्फोट?

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले. अभिनेत्री ईशा देओल-भरत तख्तानी यांचा घटस्फोट असो किंवा टेनिस स्टार सानिया मिर्झा- क्रिकेटर शोएब मलिक यांचे विभक्त होणे. या सगळ्या बातम्या अनपेक्षितरीत्या समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. आता त्यातच आणखी एका सेलिब्रिटीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला हिने तिच्या नावासमोरून तिच्या पतीचे आडनाव हटवले आहे. दिव्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर दिव्या खोसला कुमार या नावाने तिचे अकाऊंट उघडले होते. पण आता त्यावर तिचे नाव केवळ दिव्या खोसला एवढेच दिसत आहे. इतकेच नव्हे तर तिने टी-सीरिजलाही अनफॉलो केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या असून अनेक अटकळीही बांधल्या जात आहेत.

दिव्या आणि तिचा पती, टी-सीरिजचा मालक भूषण कुमार यांच्यात काही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. लवकरच ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. दिव्याने तिची पर्सनल लाईफ नेहमीच प्रायव्हेट ठेवली आहे पण आता दिव्या आणि भूषणमध्ये काही बिनसले अशी चर्चा सुरू झाली आहे. इंटरनेटवर दिव्याच्या इन्स्टा प्रोफाईलचा स्क्रीनशॉट वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या नावापुढे ती पतीचं नावही लावायची, मात्र आता तिने ते हटवलंय, असा दावाही त्यामध्ये करण्यात आला आहे.

एका रेडिट पोस्टनंतर दिव्या-भूषण कुमारच्या नात्याबद्दल विविध चर्चांनी जोर धरला आहे. दिव्या आणि भूषण विभक्त होणार का, असा प्रश्नही काही जण विचारत आहेत. दिव्या खोसला सध्या तिच्या ‘हीरो हिरोईन’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. याआधी ती ‘यारियां -२’ (२०२३) आणि ‘सत्यमेव जयते – २’ (२०२१) या चित्रपटांमध्ये झळकली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR