जिंतूर : आम्हाला आज खूप भारी वाटतंय…. आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली तरी आता चिंता नाही. आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही. नवी कोरी सायकल हातात धरून मोठ्या आनंदात समोर उभे असणारे ते दोन विद्यार्थी बोलत होते. बोलता-बोलता सायकलीची घंटी जोरात वाजवणा-या त्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.
जिंतूर तालुक्यातील दगडचोप येथील दुर्गम भागातून पायपीट करत शाळेत जाणा-या मुलांना सायकली मिळाल्याने त्यांच्या पालक वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. सामाजिक वारसा जतन करणारे पुणे येथील समाजसेवक व युवा उद्योजक मुन्ना लक्ष्मीकांत टाले आणि सौ.सुरेखा शेवाळे-टाले यांनी त्यांच्या मदत निधीतून जिंतूरचे माजी नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या उपस्थितीत दगडचोप येथील वैजिनाथ भगत व कृष्णा मगर या विद्यार्थ्यांना सायकलींचे दि.२६ रोजी जिंतूर-जालना महामार्गावरील प्रिंट हब या कार्यालयात मोफत वाटप करण्यात आले.
दरम्यान यावेळी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, संपादिका सौ.सुरेखा शेवाळे-टाले, युवा उद्योजक मुन्ना टाले, पत्रकार सचिन रायपत्रीवार, महेश देशमुख, रत्नदीप शेजावळे, शेख अलीम, सरपंच परमेश्वर ढोणे, सुधाकर साबळे, अरुण भगस, भगवान मगर, सौ.सुवर्णा मगर, सौ.गोदावरी भगस, महेश देशमुख यांची उपस्थिती होती. या मदतीबद्दल पालकाकडून टाले दापत्यांचे खूप आभार व्यक्त करण्यात आले.