28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरदुष्काळामुळे फळबाग शेतकरी चिंतेत

दुष्काळामुळे फळबाग शेतकरी चिंतेत

देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून फळबागांना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पुढील काळात फळबाग जगवताना शेतक-यांना कसरत करावी लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात फळबागांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून फळबागांचे नुकसान होणार नाही.  उन्हाळा सुरू झाला की पाण्याची पातळी कमी होऊन याचा फटका मोठ्या प्रमाणात फळबागांना बसत असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या फळबागांसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे यासाठी सेंद्रीय शेती अभ्यासक ओमकार मसकल्ले  यांनी काही उपयोजना सुचवल्या आहेत.
फळबागामध्ये मुख्यतव काही प्रमाणात सीताफळ, डांिळब, आंबा या पिकांची लागवड आहे. उन्हाळ्यात जर झाडांना पाण्याचा ताण बसला तर पुढे फळधारणेवर आणि एकंदरीत उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे आहे त्या उपलब्ध जलसाठ्यामध्ये फळबागांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. काही शेतक-यांच्या १० ते १४ वर्षांच्या जुन्या फळबागा आहेत.जर पाणी व्यवस्थापन नीट झाले नाही तर या बागा वाळून मागच्या मेहनत वाया जाऊ शकते.
पाण्याचा वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी ठिंबक सिंंचन पद्धत योग्य आहे. ठिबक सिंचनामुळे ७५ ते ८० टक्के पाण्याची बचत होते. जर बागेतील झाडे छोटी असतील कमी झाडे असतील तर, मटका पद्धतीचाही वापर केला जाऊ शकतो. लहान झाडांसाठी ७ ते ८ तर मोठ्या झाडांसाठी १५ ते २० लिटर क्षमतेचे मडके झाडांच्या बुंध्याजवळ १ फूट अंतरावर गाडगे आणि मडक्याचे तोंड कापडाने बांधून टाकावे. जसजसे पाणी मडक्यातून झिरपेल तसं झाडांची मुळे पाणी शोषून घेतात. झाडांच्या बुंध्याभोवती जे आळे केले जाते त्याला एकदा अर्ध्या बाजूने तर दुस-या वेळी राहिलेल्या अर्ध्या बाजूने पाणी द्यावे. जेणेकरून पाणी बचत होईल. आणि झाडे वाळणार नाहीत. अशा प्रकारे काळजी घेतल्यास या कडक उन्हाळ्यात देखील फळबागा जगतील असे ओमकार मस्­कले, यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR