करमाळा—केम (ता. करमाळा) येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध डेअरीचे चेअरमन यांना दुग्धाभिषेक करून गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा यासाठी अनोखे आंदोलन केले. शिवशंभू वेसीवरील राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून वेसीजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला ४० रुपये दर मिळालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत अनुदान जमा करावे. शासन निर्णयाप्रमाणे दुधाची ३४ रुपये प्रतिलिटर दराप्रमाणे खरेदी करावी.दुध दरवाढीसाठी डेअरीच्या चेअरमनला दुग्धाभिषेक दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ३.५/८.५ या गुणप्रतीच्या दुधाला ३४ रुपये दर जाहीर केला. तसा शासन निर्णय २६ जून २०२३ रोजी काढण्यात आला. परंतू अनेक खासगी संस्थाकडून शेतकऱ्यांना २६ व २७ रूपयाने दुधाची खरेदी केली आहे. ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ या गुणप्रतीच्या दुधाला कोणत्याही अटी न लावताच अनुदानासहित ४० रुपये दर मिळावा.
शेतकऱ्यांना एक जुलै २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यतची बिले द्यावी. हे अनुदान सर्व दुध उत्पादकाना मिळावे. ज्या संस्था हे अनुदान देणार नाहीत, अशा संस्थांवर कारवाई करावी. दूध उत्पादकांना कोणत्याही अटी न लावता पाच रुपयांचे अनुदान देण्याची मागणी यावेळी केली. शेतकऱ्यांना ४० रुपये दर न दिल्यास प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी प्रहार संघटनेचे सरचिटणीस बापुराव तळेकर, तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, चेअरमन अरूण लोंढे, शिवसेना अध्यक्ष सतीश खानट, चेअरमन कालीदास तळेकर, माउली बिचितकर, नागनाथ मंगवडे, सचिन बिचितकर, सोमनाथ तळेकर, निलेश गुटाळ, राहुल तळेकर, दशरथ जाधव याशिवाय मोठ्या प्रमाणावर दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ४० रुपये दर मिळाला पाहिजे. त्यांची ही मागणी रास्त आहे. पण, त्यांनी दूध रस्त्यावर न सांडता ते गोरगरिबांना वाटून शासनाचा निषेध करुन आंदोलन करण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण यांनी केले.