31.3 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeलातूरदेखभाल दुरूस्तीसाठी बंद करावा लागतोय वीजपुरवठा

देखभाल दुरूस्तीसाठी बंद करावा लागतोय वीजपुरवठा

लातूर : प्रतिनिधी
पावसाळ्यामधे वीजग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करता यावा या दृष्टिने दरवर्षी महावितरणच्या वतीने मान्सूनपुर्व देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये विद्युत यंत्रणेला अडथळा ठरणा-या झाडांच्या फांद्या छाटने, रोहीत्रांची देखभाल त्याचबरोबर उपकेंद्रामधील दुरूस्ती आदी कामांचा समावेश असतो. लातूर परिमंडळातील मान्सूनपुर्व कामांना आता वेग आला असून ७०-७५ टक्के कामे पुर्णत्वास आली आहेत. महावितरणचे कर्मचारी पुर्ण क्षमतेने देखभाल दुरूस्तीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडीत झालेल्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळयामध्ये वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी रखरखत्या उन्हातही महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी त्या-त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो, सर्व भागाचा वीज पुरवठा खंडित न करता टप्प्या टप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून वीज वाहिनीला स्पर्श करत असलेल्या झाडाच्या फांद्या छाटने, फुटलेले पीन इंसुलेटर तपासणे व बदलणे, रोहीत्रांची ऑईल पातळी तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वीजवाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, वीजहवाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली करणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे. तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणा-या त्रुटी दुर करणे, अशा प्रकारची अनेक कामे केली जातात. मात्र सदर कामे करीत असताना नाईलाजास्तव काही काळासाठी वीजपुरवठा खंडित करावा लागतो.
दुरूस्तीची कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून वीज वाहिनी तुटने, वीज तारांवरील डिस्क इंसुलेटर फुटने अशा घटना घडत असतात त्यामुळे महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कामे करावी लागतात. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणा-या त्रासाची महावितरणला जाणीव आहेच. मात्र देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून ग्राहकांनी वीजपुरवठा बंद असलेल्या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR