25.5 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र भुयार अपक्ष लढणार? 

देवेंद्र भुयार अपक्ष लढणार? 

मुंबई : प्रतिनिधी
  मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार  यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. देवेंद्र भुयार यांना अद्याप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी मिळाला नसल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार का? अशी चर्चा आता रंगली आहे. तर देवेंद्र भुयारांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे   बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे.  . त्यातच गेल्या काही दिवसांपासून मोर्शी विधानसभा मतदारसंघ  चर्चेत आला आहे. कारण मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार गटातून तिकिट मिळण्यासाठी देवेंद्र भुयार गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
 आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. अजित पवार यांच्यामुळेच मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे होऊ शकली, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोर्शीची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र भुयार यांनी प्रयत्न केले आहेत. गेल्या निवडणुकीत भुयार यांनी भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला होता.
 अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे : भुयार
  अपक्ष आमदार म्हणून ५ वर्षे अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून देखील पहिल्या यादीत देवेंद्र भुयार यांचे नाव आलेले नाही. मागील ७  दिवसांपूर्वी देवेंद्र भुयार यांचा मुंबईत पक्ष प्रवेश झाला. यानंतर देवेंद्र भुयार अखेर विधानसभा मतदारसंघात निघून गेले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून संदेश दिला आहे. ते उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR