22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
HomeFeaturedदेशातील पहिला निकाल : नारी शक्तीच्या दणक्याने प्रज्वल रेवण्णा पराभूत

देशातील पहिला निकाल : नारी शक्तीच्या दणक्याने प्रज्वल रेवण्णा पराभूत

बंगळुरू : वृत्तसंस्था
देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला. हसन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने २५ वर्षांनंतर विजय मिळवला आहे. हसन मतदार संघामध्ये एकहाती वर्चस्व असलेल्या जेडीएससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा २,९७६ व्हिडीओ व्हायरल झाले होते. २०१९ साली ते उभे राहिले होते. भाजपच्या मंजू ए यांचा पराभव करत विजय मिळवला होता. प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय वारसाही मोठा आहे. प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे.

देशातील दुस-या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार होते. यामध्ये कर्नाटक राज्यामधील २४ जागांवर मतदान होणार होते. कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचाही समावेश होता. मात्र प्रज्वल रेवण्णा उभे राहिलेल्या मतदारसंघात चार दिवसआधी म्हणजेच २४ एप्रिल २०२४ या दिवशी काही लोकांनी पेन ड्राईव्ह फेकले होते. या पेन ड्राईव्हमध्ये रेवण्णांचे व्हिडीओ होते, निवडणुकीच्या तोंडावर व्हिडीओ पसरवत रेवण्णांचा गेम केला गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR