26.4 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeलातूरद्वारकादास शामकुमारमध्ये मिस्टर व्हाईट क्लब हाऊसचा शुभारंभ 

द्वारकादास शामकुमारमध्ये मिस्टर व्हाईट क्लब हाऊसचा शुभारंभ 

लातूर : प्रतिनिधी
कापडाच्या जगतातील वेगळेपण जपणा-या येथील द्वारकादास शामकुमारच्या वतीने खास प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभ्र रंगाचे कपडे घालणा-या व्हाईटप्रेमी नागरिकांसाठी मिस्टर व्हाईट क्लब हाऊस सुरू करण्यात आहे. या मिस्टर व्हाईट हाऊस क्लबमधून पांढ-या कपड्यांचे प्रदर्शन व विक्री सुरू झाली असून १ जानेवारी रोजी मिस्टर व्हाईट क्लब हाऊसचे उद्घाटन लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उद्योजक दिलीप माने, लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय  देशमुख यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रा. शिवराज मोटेगावकर, नाथसिंह देशमुख, बाबुराव जाधव, डॉ. राम बोरगावकर, सोनू डगवले, निलेश राजमाने, संतोष बिराजदार, आसिफ शेख, शशिकांत पाटील, सच्चिदानंद ढगे, संभाजी नवघरे, राजकुमार पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते. व्हाईट हाऊस क्लबमध्ये भारतातीलच नव्हे तर परदेशातील इंटरनॅशनल ब्रँडचे कपडे ३० ते ४० टक्के कमी दरात उपलब्ध आहेत, असे गोजमगुंडे यांनी या वेळी सांगितले.
ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आता इंटरनॅशनल बँ्रडचे कपडे खरेदी करणे शक्य झाल्याचे माजी आमदार शिंदे म्हणाले. क्लबमध्ये भारतातील तीनशेपेक्षा जास्त व्हरायटी ३० ते ४० टक्के कमी दरात उपलब्ध आहेत. यात रेमंड, सियाराम, अरविंद, रुबी, पोलोनिया, ग्राडो, धनलक्ष्मी, बिर्ला सेंचुरी, लिनन ओघ सोबत साउथचा प्रसिद्ध ब्रँड रामराज उपलब्ध असल्याचे द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी सांगितले.  सोबतच मिस्टर व्हाईट क्लब हाऊसमधून कपडे खरेदी करणा-यांनासाठी  अनेक ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR