19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरधामणगाव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज

धामणगाव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील धामणगावसह परिसरातील दगडवाडी कारेवाडी व नागेवाडी येथे मंगळवारी सकाळी ११.२० च्या दरम्यान अचानक भूगर्भातून गूढ आवाज आला आहे. त्याचबरोबर परिसरात सौम्य असे हादरेही बसले आहेत. अचानकपणे भूगर्भातून आवाज ऐकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच हा आवाज नेमका कशाचा आहे ? अथवा भूकंपाची चाहूल तर नाही ना ? असा संभ्रम सध्या गावक-यांत निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी ११.२० च्या दरम्यान भूगर्भातून गूढ आवाज आल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. व एकमेकांना संपर्क करून याबाबत विचारू लागले. आवाज इतका मोठा होता की,या आवाजामुळे काय होतयं हे काही काळ कळलेच नाही, असे प्रत्यक्षदर्शी कारेवाडीचे सरपंच खंडेराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे. गूढ आवाजाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबतची माहिती धामणगावचे सरपंच प्रतिनिधी किरण कांबळे यांनी तहसीलदार काशिनाथ पाटील यांना दिली. माहिती मिळताच तहसीलदार पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी कळविले आहे. तालुक्यातील धामणगावसह परिसरातील दगडवाडी कारेवाडी व नागेवाडी येथे भूगर्भात गूढ आवाज आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली असता त्या आवाजाची आपत्ती व्यवस्थापनाने माहिती घेऊन यात भूकंपाची नोंद झाली नसल्याचे सांगितले असून नागरिकांनी भयभीत न होता सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR