30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रनकली भगवान हार गए

नकली भगवान हार गए

मुंबई : महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील ५४३ जागांचा निकाल लागला राज्यातील ४८ जागांवर महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. मिशन ४५ चे स्वप्न बघणा-या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात १७ जागा लढवणा-या काँग्रेसला १३ जागांवर विजय मिळाला आहे. याच दरम्यान संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या जनतेने नरेंद्र मोदीजींना नाकारले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हा पराभव आहे. मोदी आणि शहा यांचा अहंकार संपवला आहे. असे म्हणत निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान स्वत:ला देव समजतात, त्यांचे नाक आता कापले गेले आहे. राहुल गांधींचा परफॉर्मन्स हा मोदींपेक्षा बेस्ट आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.
भाजपाला बहुमत नाही. भाजपा हारली आहे.

अयोध्येत भाजपाचा पराभव झाला आहे. देशाच्या जनतेने नरेंद्र मोदीजींना नाकारले आहे. भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये बहुमत प्राप्त केले होते. पण २०२४ मध्ये भाजपाला बहुमत मिळालेले नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हा पराभव आहे. मोदी आणि शहा यांचा अहंकार संपवला आहे. आता यांची धावपळ सुरू आहे. सर्वांना हात-पाय जोडत आहेत. आमच्यासोबत या आणि सरकार बनवा असे सांगत आहेत. पण मी म्हणतो की मोदीजींचे सरकार येणार नाही.

मोदींनी राजीनामा द्यायला हवा. मोदीजींचा पराभव झाला आहे. भाजपाचा पराभव झाला आहे. पंतप्रधान स्वत:ला देव समजतात त्यांचं नाक आता कापलं गेलं आहे. ४०० पार, ३५० पार असे सांगत होते. मुंबई, महाराष्ट्रात आम्ही मोदींना रोखले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR