26.5 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रनगर बाजारात कांद्याची विक्रमी आवक

नगर बाजारात कांद्याची विक्रमी आवक

८०० रुपयांनी भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक सुरु झाली आहे. नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक झाली आहे. कांद्याची अचानक आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून मागील काही दिवसांपासून पाच हजाांपर्यंत गेलेला भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला आहे.

सध्या लाल कांद्याची काढणी करण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन- तीन लिलावांत लाल कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला होता. दरम्यान नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार ८७६ इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा गोण्यांची आवक झाली. क्विंटलमध्ये हि आवक ८६ हजार २८१ इतकी होती. उपबाजारात हि आवक अजूनही सुरूच आहे.

आवक वाढल्याने दरात घसरण
शनिवारच्या लिलावात हेच सरासरी भाव ३ हजार ४०० ते ३ हजार ८०० इतके होते. एकदम आवक वाढल्यानेच कांद्याचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत काहीसे कमी झाले. आजचे कांद्याचे भाव एक नंबर कांदा २ हजार ३०० ते ३ हजार रुपये आहे. तर दोन नंबर कांदा १ हजार ५०० ते २ हजार ३००, तीन नंबर कांदा ९०० ते १५०० तर चार नंबर कांदा ३०० ते ९०० रुपये दरांवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR