24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरनळाच्या पाण्यात लहानशा पांढ-या जीवंत आळ्या

नळाच्या पाण्यात लहानशा पांढ-या जीवंत आळ्या

लातूर : प्रतिनिधी
शहर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या नळातून, दि. १९ सप्टेबर रोजी विवेकानंद चौक परिसरात सकाळी ९ च्या सुमारास, चक्क लहान – लहान व लाबंट अशा पांढ-या आळ्या मोठ्या प्रमाणात आल्याने, महिलांमध्ये भीती पसरली आहे.
महानगरपालिकेच्या घरगुती पिण्याच्या पाण्याच्या नळाला नेहमीप्रमाणे गुरुवारी विवेकानंद चौक व मातोश्री रमाईनगरमध्ये सकाळी पाणी सुटले होते. महिला वर्गाने प्रारंभीचे थोडे पाणी सांडावांडी करिता म्हणून घेतले. तसेच नित्य पिण्यासाठी म्हणून, पातळ दुहेरी सुती कपड्याने गाळून घेतले. आणि मग साठवणीसाठी म्हणून स्वच्छ केलेल्या भांडी व टाक्यामध्ये पाणी घेत असताना, हा प्रकार कांही महिलांच्या लक्षात आला. नळातून आलेल्या पाण्यावर पांढ-या रंगाच्या, कांही २-३ से. मी. च्या तर कांही ४-५ से. मी. लांबीच्या आणि हात शिलाईच्या लहान सुईच्या अर्ध्यापेक्षा अधिक जाड अकाराच्या असाव्यात.
 शिवाय त्या पाण्याखाली थरात न राहता वा जाता, त्या अगदी वरतीच तरंगत होत्या. यापूर्वी शनिवार १४ सप्टेंबर रोजी सोडण्यात आलेल्या, पाण्यातसुद्धा अगदी असाच प्रकार निदर्शनास आला होता. मात्र यदा-कदाचित कांहीसी एखाद घटना असावी म्हणून, महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु परत पुढे ५ दिवसांनी पण तोच प्रकार झालेला दिसून आला.
त्यामुळे महिलानी संताप व्यक्त्त केला आहे. लातूर महानगरपालिका प्रशासनाने, यात तातडीने लक्ष घालून चौकशी करावी. याचा अंतिम शोध घेऊन योग्य प्रतिबंध करावा, अशी  मागणी सुंदरताई कांबळे, मधुश्री शिंदे, सूर्या रायवाडीकर व सोनाली भारती आदी महिलांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR