28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरनवजात अर्भकावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया 

नवजात अर्भकावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया 

लातूर : प्रतिनिधी
विवेकानंद रुग्णालयात जन्मजात -हदय विकृती असणा-या तीन महिन्यांच्या नवजात अर्भकावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येते.  रुग्णालयात एप्रिल २०२४ मध्ये तीन महिन्यांचे जन्मजात हृदय विकृत असणारे बालक रुग्णालयात दाखल झाले. पीडीए अवस्थेमध्ये, महाधमनी (शरीराला शुध्द रक्तपुरवठा करणारी) व हृदयाकडून फुफ्फुसाकडे अशुध्द रक्त्त वहन करणारी यामधील पडदा जो जन्मानंतर नैसर्गिकरित्या बंद होतो तो बंद होत नाही. त्यामुळे शुध्द व अशुध्द रक्त एकत्र मिसळते, परिणामी दम लागणे, हृदयाची अनियमित गती, शरीराची वाढ खुंटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. उपचाराभावी मृत्यूचा धोकाही संभवतो. तर अशी ढऊअ ग्रस्त अर्भक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर निदान पश्चात लक्षणांची तीव्रता व रुग्णाची खुंटलेली वाढ लक्षात घेता त्वरित शस्त्रक्रिया (ढऊअ छ्रँ३्रङ्मल्ल) करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. (सामान्यत: ही शस्त्रक्रिया अर्भक  किमान सहा महिन्याचे झाल्यानंतर केली जाते.)
प्राथमिकपूर्व तपासण्या झाल्यानंतर सदर रुग्णाचे  डॉ. सारंग गायकवाड (बालहृदय शस्त्रक्रिया तज्ञ, मुंबई), डॉ. नितीन येळीकर (बालहृदयरोग तज्ञ) व त्यांच्या चमूने कुठल्याही गुंतागुंतीशिवाय पार पाडले. शस्त्रक्रियेदरम्यान व पश्चात रुग्णाची प्रकृती स्थिर राहिली. सात दिवसानंतर रुग्णास सुखरुप घरी पाठवण्यात आले. सध्या दोन महिन्यानंतर रुग्णाची प्रकृती उत्तम आहे, वजनातही योग्य वाढ होत आहे. विशेषत्वाने उल्लेख करावयाचा म्हणजे समाजहितैषी दात्यांच्या सहयोगामुळे या रुग्णावर पूर्णत: मोफत उपचार करणे रुग्णालयास शक्य झाले. या संपूर्ण उपचार प्रक्रियेमध्ये डॉ. प्रविण लोहाळे (भूलतज्ञ),  बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद तोष्णीवाल, डॉ. चंद्रशेखर औरंगाबादकर (अतिदक्षता विभाग तज्ञ) निवासी वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व रुग्णालय प्रशासन या सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे डॉ. सारंग गायकवाड व डॉ. नितीन येळीकर यांनी नमूद केले.
रुग्णालयात निरनिराळया जन्मजात हृदय विकृर्तीवर शस्त्रक्रिया व उपचार नियमित केले जातात. मागील दोन वर्षांमध्ये १५ ते २० हृदय शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत १०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी मोफत हृदय शस्त्रक्रिया रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. पुढील शस्त्रक्रिया शिबिर दि. २८, २९, ३० जून रोजी घेण्यात येणार आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR