23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरनववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाई सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाई सज्ज

लातूर : विनोद उगीले
नव वर्षाच्या स्वागतासाठी आता पासूनच तरूणाईत काऊंटडाऊन सुरू झाले असून अनेकांनी तर नववर्षाच्या स्वागताचे ‘प्लॅंिनग’ सुरू केले आहे. नववर्षांचे स्वागत रम्यस्थळीच करण्याकडे तरूणाईचा विशेष कल आहे. लातूर शहरातील व जिल्ह्यातील हॉटेल, उपहारगृह चालक व अन्य पुरक व्यवसायकांनीही थर्टी फस्टची जोदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान गतवर्षीप्रमाणे यंदाही हुल्लडबाजी करण्या-यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

थर्टीफस्ट नववर्षाच्या सुरवातीला अद्यापही सहा दिवसांचा कालावधी असला तरी तरूणाईने आतापासूनच सर्व प्लॅंिनग सुरू केले आहे. सोशल मिडियात डोकावून बघितल्यास शुभेच्छांचा वर्षाव कोण काय काय करणार, कसे करणार हे आधीच ठरवून घेतल्या असल्याचे बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर शहरातील हॉटेल, रेस्टारंट, बार आदी व्यवसायीकही नववर्षाला नवीन रंगढंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. दि.३१ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजल्यापासून जल्लोषाला सुरूवात होतो. दुचाकी, चारचाकी गाडीतून तरूणाई शहरात तसेच शहराबाहेरील रम्यस्थळी जथ्या जथ्याने जाताना दिसतात. त्या जंगलातीलच लाकुडफाटे गोळा करून बोच-या थंडीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.

नववर्षाच्या पुर्वसंध्येला दारू विक्री जोमात राहणार असल्याने पोलिसांची व राज्य उत्पादन शुल्कची पथकेही सज्ज असणार आहेत. नववर्षाच्या स्वागतला गालबोट लागू नये यासाठी सामान्य परिवारातील लोक नको ती पार्टी असेही दबक्या आवाजात बोलत आहेत. त्यामुळे अशा घटनांना पायबंद घालण्याची गरज लक्षात घेवून लातूर पोलिसांनी अशा हुल्लडबाजावर करडी नजर ठेवली आहे. ‘थर्टी फस्ट म्हटले की दंगा, हुल्लडबाजी असेच काहीसे समीकरण होवून बसले आहे. नववर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली निव्वळ दारूची अवैधविक्री होत असून हॉटेल, बियर बार, वाईन्स शॉप चालकाची चांगलीच चलती सुरू राहणार आहे. या काळात लाखों रूपयांची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे नववर्षाच्या पर्वावर बाजारपेठेत ३१ डिसेंबरला पाय ठेवायलाही जागा राहत नाही. त्यामुळे अनेक जण निर्जन ठिकाणी जाणे पसंद करतात. मात्र निर्जन स्थळीही असामाजिक तत्वांचा वावार असल्याने पोलिसांनी तशा सुचना दिल्या आहेत. दरम्यान बोच-या थंडीतही तरूणाईचा उत्साह कायम असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR