27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनागपूरमध्ये बस जळून खाक; १ ठार

नागपूरमध्ये बस जळून खाक; १ ठार

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये एका ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात नागपूर-सुरत महामार्गावरील काळसर गावाजवळ घडला आहे. या बसने नेमके किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती समोर आलेली नाही. मात्र अन्य प्रवासी वेळीच बसबाहेर पडल्याने ते सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त बस जळगावकडून धुळ्ययाकडे जात असतानाच बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर बसला आग लागली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्ती या बसने प्रवास करत होती अशी माहिती समोर आली असून ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या अपघातामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

बसला एक दुचाकी धडकल्याने संपूर्ण बस कशी काय जळून खाक झाली याबद्दल चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून नेमकं काय घडलं? दुचाकी आणि बसचा अपघात कसा झाला? गाडीमध्ये अपघात झाल्यानंतर आवश्यक असणारी यंत्रणा होती का? मयत व्यक्ती कोण आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR