20.4 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्रनाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचे निधन

नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचे निधन

भंडारा : प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे रविवार (ता. २९) पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचेवृध्दापकाळाने निधन झाले त्या ९० वर्षाच्या होत्या. नाना पटोले यांना मातृशोक झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

तर मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR