18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रनाराजी नको तात्काळ फ्लॅट ताब्यात घ्या

नाराजी नको तात्काळ फ्लॅट ताब्यात घ्या

नाराज आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारमधील खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिपदाच्या शपथविधीला १७ दिवस उलटल्यानंतरही अद्याप १८ मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील १५ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. आवडीची खाती न मिळणे त्याशिवाय बंगला न आवडल्याने अनेकांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे.

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना आदेश जारी केले आहेत. ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यांनी त्वरित पदभार स्वीकारा. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री यांनी बंगले आणि फ्लॅटवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी नको तात्काळ फ्लॅटही ताब्यात घ्यावे आणि कामाला सुरुवात करावी असा आदेश दिला आहे.

महायुतीतील डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनी आमदारांना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. अनेक आमदारांना दिलेले फ्लॅट आणि बंगले पसंत पडलेले नाहीत. मात्र आता देण्यात आलेल्या फ्लॅट आणि बंगल्यात राहा. येत्या वर्षात काही मंत्र्यांना नव्या जागी मोठे फ्लॅट देण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR