24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरनाशिकचा हर्षवर्धन ठरला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर 

नाशिकचा हर्षवर्धन ठरला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर 

लातूर : प्रतिनिधी
नाशिक येथील हर्षवधन सदगीर आणि सोलापूरचा जयदीप पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीत जयदीप पाटील याने टांग डाव मारायचा प्रयत्न केला. परंतु हप्ते भरून हर्षवर्धन याने चितपट निकाली कुस्ती करून महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. एक लक्ष रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक मान्­यवरांच्­या हस्­ते देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक-दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १५ वर्षापासून भरविण्यात येत आहेत. हिंदकेसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड, आमदार रमेश कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. हनुमंत कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, राजेश कराड, डॉ. पी. जी. धनवे व वस्ताद पै. निखिल वणवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेत ८६ किलो वजन गटात रवी चव्हाण-पुणे, कौतुक डाफळे- कोल्हापूर, अविनाश गावडे-पुणे, एकनाथ बेद्रे-सोलापूर, ७४ किलो वजन गटात अभिजीत भोसले-सोलापूर, मशिद शेख-कुर्डुवाडी, विष्णू तातपूरे, चौतन्य साबळे-पुणे, ७० किलो वजन गटात विकी कारे-पुणे,  महेश तातपूरे झ्ररामेश्वर, अमर मळगे-सोलापूर, सुदेश बागल -कुर्डूवाडी,  ६५ किलो वजन गटात निखील पवार-लातूर, पवण जेण्णर-नाशिक, सद्दम शेख-कोल्हापूर, सुशांत पाटील- कोल्हापूर, ६१ किलो वजन गटात विजय डोंगरे-सोलापूर, अतुल चेचरे – सोलापूर, अविष्कार  गावडे -पुणे, अनिकेत पाटील-  कोल्हापूर, आकाश गड्डे -रामेश्वर, धवल चव्हाण-धाराशिव, विशाल सुरवसे-सोलापूर, लहू चौरे-सांगली या विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक यांना रक्कम व पारितोषिक देण्यात आले.
७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. या पैकी कमलाकर मुळे हे विजेते ठरले तर शिवाजी मोरे हे उपविजेते ठरले.  या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती-सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन बाबा निम्हण यांनी केले. तर प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR