16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनाशिकजवळ वायुसेनेचे ‘सुखोई’ कोसळले; २ वैमानिक बचावले

नाशिकजवळ वायुसेनेचे ‘सुखोई’ कोसळले; २ वैमानिक बचावले

नाशिक : प्रतिनिधी
भारतीय वायू दलाच्या विमानाला अपघात झाला. नाशिकमध्ये वायूदलाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात विमान कोसळले आहे. वायू दलाचे विमान कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या वायुदलाच्या विमानाचे तुकडे-तुकडे झाले आणि त्याने पेट घेतला. दरम्यान, या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत. पायलट पॅराशुटच्या सहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

शिरसगाव परिसरात एचएएल कंपनीचे ‘सुखोई-३०’ या लढाऊ विमानाने ओझर विमानतळ येथील टेस्टिंगसाठी उड्डाण केले, परंतु, काही वेळातच शिरसगाव येथे सुखदेव मोरे यांच्या शेतात ते कोसळले. दरम्यान दोन्ही वैमानिकांना विमानात बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने ते पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले.

दरम्यान यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली, दोन्ही वैमानिकांना उपचारासाठी एचएएल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांचे नाव कैप्टन बोकील आणि विस्वाल असे असून सदर विमान कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला.

मोरे या शेतक-याचे जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीसाठी वापरण्यात येणा-या विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण विभागाच्या वीज कनेक्शन तारा देखील नादुरुस्त झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR