22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये २०२७ ला होणार कुंभमेळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

नाशिकमध्ये २०२७ ला होणार कुंभमेळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या आहेत.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यांतील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नाशकातील त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ ला होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला.

नाशिक ‘रीलिजियस हब’
नाशिक-त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक ‘रीलिजियस हब’ म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, अशा ठिकाणची अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.

८ ते १० हेलिपॅड तयार करणार
कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून पर्यटक दर्शनासाठी येत असतात. पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे ८ ते १०हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गाने येणा-या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणा-या सर्व मार्गांचे काँक्रिटीकरण तसेच रुंदीकरण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी फडणवीसांकडून देण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR