29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeना मिसाईल, ना बाँब; एनर्जी वेव्हजचे अस्त्र भारताच्या हाती

ना मिसाईल, ना बाँब; एनर्जी वेव्हजचे अस्त्र भारताच्या हाती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगात सध्या सगळीकडे इस्रायलच्या मोसादची चर्चा आहे. त्यांनी तैवानच्या कंपनीला हाताशी धरून छोट्याशा पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये काही ग्रॅम स्फोटक वस्तू ठेवून लेबनॉनमध्ये हजारो बॉम्बस्फोट केले. हिजबुल्लाहच्या हजारो दहशतवाद्यांना एकाचवेळी मारण्यासाठी मोसादने खतरनाक योजना अंमलात आणली. अशातच ‘डीआरडीओ’ देखील असेच काहीसे अस्त्र बनविण्याच्या तयारीला लागली आहे.

‘डीआरडीओ’ या वर्षाच्या अखेरीस हवाई दलासाठी एक असे अस्त्र निर्माण करत आहे ज्यामध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ वापरले जाणार नाहीत. परंतू, त्याचा वार एवढा अचूक असेल की स्फोटकेही ते करू शकणार नाहीत. ‘डीआरडीओ’ने अएह&उ-ङक ही यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी अंतिम मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहे. या खतरनाक अस्त्राला नेत्र असे नाव दिले आहे.

या नेत्रचा वापर शत्रूची विमाने आणि युएव्ही ड्रोन ओळखणे, त्यांना ट्रॅक करणे यासाठी केला जातो. यानंतर ती विमाने लेझर लाईट सारख्या प्रकाशाच्या वेगाने जाणा-या एका एनर्जी बॉम्बने उडविता येतात. इंडियन एक्सप्रेसनुसार हवाई दल सध्या अशा दोन यंत्रांचा वापर करत आहे. हे शस्त्र अँटी ड्रोन हाय पावर मायक्रोवेव्ह सिस्टीमवर काम करते. याची रेंज १ किमीपर्यंत आहे.

याचबरोबर डीआरडीओ ३० किलोवॅटच्या डायरेक्ट एनर्जी वेपन सिस्टीम तयार करण्याच्या कामाला लागली आहे. याद्वारे हवेतील वस्तू लक्ष्य केल्या जाऊ शकतात. याची चाचणी आणि वापर जगातील काही अद्ययावत देशांचे सैन्य करत आहे. युक्रेन युद्धात ड्रोन सर्वात खतरनाक म्हणून उदयास आले आहेत. या ड्रोनना हवेतच उडविण्यासाठी डीआरडीओ काम करत आहे. यामध्ये काँन्सट्रेटेड इलेक्ट्रोमॅग्नेटीक एनर्जीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी लेझर, मायक्रोवेव्ह आदी तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR