निलंगा : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यांना नवीन ईपॉस मशीन वाटपाच्या नवीन धोरणानुसार निलंगा तालुक्यातील एकूण १९३ रास्त भाव दुकानदार यांना नवीन ४ जी ईपॉस मशीनचे वाटप तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
निलंगा तालुक्यात एकूण १९३ रास्त भाव दुकानदार असून त्यांना यापुर्वी २ जी ईपॉस मशीनचे वाटप करण्यात आले होते. सदर मशीन कालबाहय झाल्यामुळे व धान्य वाटपाच्या वेळी व्यवस्थित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत नवीन ४ जी ईपॉस मशीन पुरविण्यात आल्या आहेत. सदर प्राप्त मशीनचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी कार्यालयाचे ईपॉस मशीनचे जिल्हा कोऑर्डीनेटर येरोळकर व त्यांचे सहकारी .ंिसदाळकर यांनी सर्व रास्त भाव दुकानदारांंना देऊन नवीन मशीन मध्ये कोणते बदल करण्यात आले असून त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
सदर मशीनमध्ये आता दोन इनबील्ट सीम कार्ड देण्यात आले असून सदर सीमकार्ड हे अॅटोमॅटीकरित्या नेटवर्क प्राप्त करण्यास सक्षम सांगीतले तसेच सदर मशीनमध्ये आता पुर्वीप्रमाणेच बायोमॅट्रीक पध्दतीने, ओटीपी
पध्दतीने धान्य वितरीत होणार असून ज्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्यामुळे बायोमॅट्रीक पध्दतीने धान्य उचलता येत नव्हते त्यांच्यासाठी डोळयाच्या बुबळाचे स्कॅंिनग करुन धान्य वितरण करण्याची सुविधा सदर नवीन मशीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीही संबंधिताने सर्व रास्त भाव दुकानदार यांना दिली.
या प्रसंगी तहसीलदार .प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व रास्त भाव दुकानदारांना मार्गदर्शन करुन नवीन मशीनमधील बदल समजावून घेवून त्याप्रमाणे धान्याचे वाटप करावे असे आवाहन केले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार. प्रविण आळंदकर, रास्त भाव दुकानदारांचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील, पुरवठा विभागाचे अवल कारकून बालाजी शिंदे, महसूल सहायक माधव कार्लेकर, तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.