निलंगा : प्रतिनिधी
सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय असलेले माराठा सेवासंघाच्या मुशीत वाढलेले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक बगदुरे यांना निलंगा विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी निलंगा सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक बगदुरे हे मराठा सेवा संघाच्या मुशीत वाढलेले सेवा संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. समाजसेवेची ओढ असल्याने शासकीय नोकरीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन गत वीस वर्षापासून राजकारणासह सामाजिक चळवळीत हिरीरीने भाग घेऊन जिल्हाभर जनसंपर्क करत शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणाला समाजकारणाची जोड देत लातूर जिल्ह्यासह निलंगा मतदार संघात मोठा जनसंपर्क असलेले व निलंगा विधानसभेची चौफेर माहिती असलेले नेतृत्व आहे.
तसेच जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत गेल्या वीस वर्षापासून राजकारणासह समाजकारणात हिरेरीने भाग घेणारे नेतृत्व असल्याने निलंगा सकाल मराठा समाजाच्या वतीने इंजि. विनायक बगदुरे यांना निलंगा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवली सराटी येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी इंजि. विनायक बगदुरे यांच्यासह निलंगा सकल मराठा समाजाचे बहुसंख्य बांधव उपस्थित होते.