नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दहाही उमेदवारांनी शुक्रवारी खर्च निरीक्षकांकडे खर्चाचा तपशील सादर केला. उमेदवारी खर्चात डॉ. भारती पवार यांनी आघाडी घेतली असून त्यांचा २५ लाख रुपये खर्च झाला आहे.
आघाडीचे भास्कर भगरे यांनी प्रचार व अन्य बाबींवर १७ लाखांचा खर्च केला. सदरचा खर्च १४ मेपर्यंतचा आहे. मतदान पार पडल्यानंतर बुधवारी (दि. २२) पूर्ण खर्च सादर करावा, अशा सूचना खर्च निरीक्षक मुकांबिकेयन एस. आणि निधी नायर यांनी दिल्या आहेत.