नवी दिल्ली : नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय जाहीर करीत नीट परीक्षा पुन्हा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला आहे किंवा पेपर लीक झाल्याचे पुरेसे पुरावे समोर आले नसल्याचे न्यायालयाने म्हटले. नीट यूजी प्रकरणाची
चौकशी सीबीआयकडे सोपवल्यानंर १० जुलै, १७ जुलै, २१ जुलै २०२४ रोजी सीबीआयने ६ रिपोर्ट फाइल केले. त्यामध्ये गोंधळ झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
सध्याच्या परिस्थितीत परीक्षेचा निकाल चुकीचा आहे किंवा निकालात पद्धतशीरपणे फेरफार झाल्याचा निष्कर्ष रेकॉर्डवर आलेला नाही. रेकॉर्डवरील डेटा नीट-यूजी प्रश्नपत्रिका पद्धतशीरपणे लीक झाल्याचेही म्हटलेले नाही. पण जर या परीक्षेच्या फएर परीक्षेचे आदेश दिल्यास या परीक्षेत बसलेल्या २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतील. त्यामुळे नीट-यूजी परीक्षा रद्द करण्याचा आदेश देणे समर्थनीय नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.