22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरनोकरीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक

चौघांवर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा

सोलापूर –
नोकरीचे आमिष दाखवून पाचजणांची १० लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या चौघांवर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविता विलास चव्हाण (वय ४२, रा. सोनंद, ता. सांगोला) या महिलेच्या फिर्यादीवरुन सोमनाथ शंकर जाधव (वय ३०), नवनाथ शंकर जाधव (वय ३२, दोघे रा. सोनंद, ता. सांगोला), रोहित पवार (वय ३५) आणि सिध्दनाथ खबाले(वय २८, दोघे रा. महुद बुद्रुक, ता. सांगोला) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता चव्हाण, बेबीताई विठ्ठल चव्हाण, कौशल्या विष्णु चव्हाण, नागर सिध्देश्वर चव्हाण, शशिकांत बाळकृष्ण चव्हाण यांच्या मुलांना मर्चेंट नेव्हीत नोकरी लावतो, रोहित पवार व सिध्दनाथ खबाळे यांची मर्चेंट नेव्हीतील अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत असे सांगून सोम नाथ जाधव व नवनाथ जाधव यांनी चव्हाण यांच्याकडून जुन ते ऑक्टोबर २०२३ याकालावधीत पैसे घेतले. नेव्हीतील साहेबांशी संपर्क साधून बोलणे करून देऊन, नेव्हीतील साहेबांशी बोलणे झाले आहे, मुलांना ७० हजार रुपये महिना पगाराची नोकरी लावतो.

मुलाखत पास नाही झाले तर पैसे परत देतो असे जाधव यांनी सांगितले. तसचे जाधव व त्याच्या साथीदारांनी चव्हाण व इतरांच्या मुलांना रोहतक (हरियाणा), जयपूर, दिल्ली याठिकाणी घेऊन जाऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अन्न पाणी न देता कोंडून ठेवले, बाहेर येऊ दिले नाही, पालकांशी संपर्क साधू दिला नाही. फोनवर पालकांना त्यांच्या मुलाचे ट्रेनिंग चालू आहे असे सांगून पालकांना काहीही कळू दिले नाही. जाधव व त्याच्या साथीदारांनी सविता चव्हाण यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये, बेबी चव्हाण यांच्याकडून २ लाख रुपये, कौशल्या चव्हाण
यांच्याकडून १ लाख रुपये, नागर चव्हाण यांच्याकडून दीड लाख रुपये, शशिकांत जाधव यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये असे एकूण ९ लाख ९० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. म्हणून सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पुजारी पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR