लातूर : प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजाताई मुंडे विजयी झाल्या नाही तर सचिन कोंडीबा मुंडे नसेल असा व्हिडीओ व्हायरल करणा-या सचिनचा बस मागे घेत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात संबधित एसटी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दिवसभर अहमदपूर तालुक्यात ही सचिनचा अपघात आहे की आत्महत्या अशी चर्चा अहमदपूर तालुक्यात चालू होती.
येस्तार, ता. अहमदपूर येथील ट्रॅक्टर चालक सचिन कोंडीबा मुंडे याची एक व्हिडीओ क्लीप ज्यात पंकजाताई मुंडे विजयी नाही झाल्या तर सचिन नसेल असे म्हणणारी क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून दुर्देवान दि. ७ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बोरगाव पाटी कोप-यावर एमएच १३ सी.यू.७९२९ या बसच्या चालकाने आपल्या ताब्शातील बस पाठीमागे घेताना ती निष्काळजी व हायगईपणाने चालवून सचिन कोंडीबा मुंडे अंगावरू घातल्याने यातच त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात संग्रात वैजनाथ मुंडे रा.येस्तार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांली एमएच १३ सी.यू.७९२९ या बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा अधिक तपास सपानि गोखरे हे करीत आहेत.