22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर

पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर

बीड : प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी ६ आमदारांचा फौजफाटा होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजाला आघाडी घेता आली नाही. परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसाठी जिवाचं रान केलं होतं पण मुंडे यांच्या पदरी निराशाच झाली. लोकसभेतील पराभवानंतर भाजप अलर्ट मोडवर गेली असून पंकजा यांच्या पराभवानंतर सहा आमदारांची विधानसभेसाठी धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. बीड लोकसभेची लढत अतिशय रोमहर्षक झाली. प्रत्येक फेरीनंतर अन् प्रत्येक तासाला चित्र बदलत होते. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय होईल, असा अनेकांचा अंदाज होता. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना आघाडी घेता आली नाही. परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही.

बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसाठी जिवाचं रान केलं होतं, सोबत सहा आमदार पाठिशी असतानाही पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशाच आली. सहा आमदारांमध्ये गेवराईचे अमदार, लक्ष्मण पवार, अजित पवार गटाचे दोन आमदार प्रकाशदादा सोळुंके, बाळासाहेब अजबे, आमदार नमिता मुंदडा व आमदार सुरेश धस सोबतच
खासदार प्रीतम मुंडे, खासदार भागवत कराड यांच्या प्रचाराला सुध्दा जनतेने नाकाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR