25.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeपरभणीपंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह कमेंट; ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह कमेंट; ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक

परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एका तरुणाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे वाद निर्माण झाला. याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून जिंतूर शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. कमेंट करणारा तरुण हा अल्पवयीन असून त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या जिंतूरमध्ये शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या आक्षेर्पाा पोस्टनंतर बीडमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होतं. बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी याच्या निषेधार्थ बंदची हाक दिली होती. बीड, पाथर्डी, वडवणी, शिरुर यांसारख्या अनेक गावांनी बंदची हाक दिली होती. आता अशातच पुन्हा एकदा परभणीमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर एका पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली आहे. पंकजा मुंडेंबाबत ही आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली आहे. याचेच पडसाद परभणीच्या जिंतूरमध्ये उमटले आहेत. ओबीसी समाजाच्या वतीने आज जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला.

बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR