32 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील गोरेगावच्या जवाहरनगरमध्ये संशयास्पद अवस्थेत पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर, अशी या मृत दाम्पत्याची नावे आहेत. किशोर पेडणेकर यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलें आहे. तर पत्नी राजश्री पेडणेकर यांचा मृतदेह घरात सापडला होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून राजश्री यांची हत्या झाल्याचा संशय वर्तवला जात आहे. ही धक्कादायक घटना गोरेगावच्या जवाहरनगर येथे घडली आहे. गोरेगाव पोलिसांनी तपास सुरू केला असून शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी ही घटना समोर आली.

गोरेगाव पोलिसांना सकाळी साडेपाचच्या सुमारास एक माहिती मिळाली. जवाहरनगर येथील टोपीवाला मॉलजवळ बीएमसी मार्केट परिसरात एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलिसांनी या व्यक्तीला रुग्णालयात नेले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले होते. किशोर पेडणेकर हे वसईमध्ये एका खाजगी कंपनीत काम करत होते, तर त्यांची पत्नी राजश्री पेडणेकर फिजिओथेरपिस्ट असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR