सोलापूर: सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम दर्पणकार जांभेकर व कै रंगा अण्णा वैद्य यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले सचिव. प्रा पीपी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत पत्रकार संघाचे अहवाल सादर केले . तर कार्याध्यक्ष अय्यूब नल्लामंदू यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केले. अध्यक्ष अशोक मठपती व सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी सर्व मान्यवरांना शाल बुके सन्मान चिन्ह देवून सत्कार केला.
या नंतर संचारकार स्व रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ वरिष्ठ वार्ताहर विनोद कामतकर यांना तर . ‘कासिदकार ‘ स्व . अ. लतीफ नल्लामंदू यांचे नावे असलेला पुरस्कार पत्रकार आफताब अन्वर शेख यांना आणि , बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्व बाबुराव मठपती यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ संपादक प्रशांत माने यांना शहर मध्यचे आमदार मा , देवेंद्र कोठे यांच्या हस्ते व पोलीस आयुक्त एम राज कुमार , जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के , निवड समितीचे अय्यूब नल्लामंदू ,यांच्या ‘ उपस्थितीत कै . रंगा अण्णा वैद्य सभागृह येथे गौरव पत्र , पांच हजार रुपये रोख सन्मान चिन्ह , पुस्तके देऊन सन्मान करण्यात आले
सचिव प्रा पी पी कुलकर्णी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना एक निवेदन सादर करून पत्रकार भवनात ” स्व . लतीफ नल्लामंदू सार्वजनिक वाचनालय ” साठी १० लाख रु. अनुदानाच्या मागणीचे निवेदन दिले .
प्रमुख पाहुणे देवेंद्र कोठे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असतो म्हणून हे डोळे नेहमी स्वच्छ असले पाहिजे व ज्येष्ठ पत्रकार
अ लतीफ नल्लामंदू सार्वजानिक वाचनालयला मी सर्व सहकार्य करत निधी उपलब्ध करून देणची गवाही दिली .या नंतर मा पोलीस आयुक्त एम . राजकुमार यांनी मार्ग दर्शन करत म्हणाले कि – पत्रकार समाजातील सार्वजनिक मुद्दे उपस्थित करून सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे प्रमाणिक कार्य करावे . वृतपत्र हा चौथा स्थंब असल्यामुळे याचे जतन सर्वानी केले , ते पुढे म्हणाले सोलापूरकर पत्रकारांमुळे मला मराठी बोलता येते याचा मला समाधान वाटते .
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार विश्वनाथ वनकोरे , दिव्य मराठीचे मीरखोर , श्रीशैल चिंचोळकर , डॉ शफी चोबदार , प्रशांत जोशी , जुंजा , नागेश दांतकाळे , अ कुद्दूस नल्लामदू , इक्बाल बागबान , दशरथ वडतिले , बाळा साहेब वाघमोडे , एम एन पटेल , देविदास उत्पात , राजकुमार शहा , ज्ञानेश्व माऊली ,’ इम्तियाज काजी , नागेश कुलकर्णी , तरुण भारतचे ,दिलीप पेढे , धनंजय कुलकर्णी , योगेश तुरेराव , शौकत काझी , माजी माहिती अधिकारी अंबादास म्याकल , भावसार सारंग गार्डी , मजहर अलोळी इ चा भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला .
या वेळी नवीन प्रेस ॲकट संदर्भात योगेश तुरेराव यानी मार्ग दर्शन केले .सुत्र संचालन प्रा देविदास उत्पात यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुराणा यांनी मानले.